अंधारूनी मौन आले... काळोखे किनारे,,,
सावलीच्या सोबतीवर कोणाचे पहारे...
कोण कोणाची तहान कुणी वाहावे जरासे...
जवळकीचे झाले अंतर.. दुरावे नवे,,,,
दयाघना...
परवा स्वप्नीलच्या आवाजात रेकॉर्ड झालं हे गाणं..... कित्ती दिवसांनी बझ इन मध्ये गेले.... एक सेकंद दाटून आलं.... आपला स्टुडीओ.... आपलं दुसरं घर... माहेरी परत आल्यावर जसं वाटलं होतं तसं वाटलं... निलेश समोर आला ओळखीचं हसू हसत... आणि मला त्याला मिठी मारून रडावसं वाटलं .... किती तरसलो असतो आपण एकाद्या गोष्टीसाठी... किती तहानलेले असतो... हे कधी कधी ती गोष्ट हातून गेल्यावर कळतं... तसं कधी कधी ती गोष्ट मिळाल्यावर सुद्धा उमगतं.... बझ इन चा तो परिचित गंध, लाईटस, हिरव्या भिंती.... आणि समोर गाणारा स्वप्नील... त्या क्षणी माझ्यासाठी सुखावण्याची दुसरी परिभाषा नव्हती आणि दुखावलं जाण्याची दुसरी व्याख्या...
तो हे गाणं गायला... दयाघना... समीर च्या फिल्म साठी लिहिलेलं, अशी सोन्यासारखी गाणी अशा दगडांच्या फिल्म साठीच का होतात कळत नाही... अर्थात याचं दुखः करायचं म्हटलं तर वैभ्या ला तर रुदाली मधल्या बायकांसारखं मातमच करायला लागेल... असो... खूप सुंदर गायलं स्वप्नीलने .... आम्ही सगळेच त्या दिवसही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो... निलेश माझ्या... स्वप्नील त्याच्या... मी दोघांच्या ... आणि आमचा डायरेक्टर आम्हा सगळ्यांच्या... हेहेहे..
कुठून कुठे गेले... काय लिहायचं होतं... वैभव चा फोन आला हे ऐकून..... माझ्यासाठी तोच एक क्रायटेरिया आहे,,, (हे त्याने वाचलं तर कपाळाला हात लावेल... नाहीतर नेहमीच्या तुच्छतेने झटकून टाकेल...god मी काय लिहित सुटले परत.... तर.. वैभव चा फोन आला होता... तो म्हणला क्या बात है... वगैरे वगैरे.. काय महाला तो अफाट.. अफाट लिहिलयस... का रे आभाळ विकून घर माझे बांधले रे... वा वाह.....
i was thrilled... shaken... shivering as usual.... आवाजावर संयम ठेवत म्हटलं... thanks...
thanks वैभ्या.... तुझ्या compliment ने मला काय मिळतं तुला नाही कळणार... तो ही म्हणाला... बरंय.... काही काही गोष्टी न कळलेल्याच ब-या.. राहू द्याव्यात ....
still thanks....ur compliment keeps me alive... gives me strength to breath... thanks....
.....
कोण कोणाची तहान कुणी वाहावे जरासे...
...........................................................................
