थकून गेलेय मी आता... खूप खूप... कामाचा ताण आता इतका वाढत चालला आहे की त्राण उरले नाहीत अंगात...
खरं तर किती बेभान करणारे क्षण येऊन जातात काम करताना...
किती सुंदर क्षणांच्या चांदण्या अंधार उजळवून जातात...
पण ही क्षणिक बेभानता कायम उराशी कवळून नाही जगता येत...
चार सुंदर क्षणांच्या चांदण्या हाती लागेस्तोवर अंधारात किती ठेचकळावं लागतं...
आणि त्या हाती लागल्या म्हणून काय रात्र संपतेच असं नाही ना...
मला अशा वेळेस प्यार किया तो डरना क्या मधली मधुबाला आठवते...
"मौत वोही जो दुनिया देखे, घुट घुट कर यू मरना क्या.." किंवा
"छुप ना सकेगा इश्क हमारा, चारों तरफ़ है उनका नजारा"
असं बेगुमानपणे, बेधडक सांगणारी अनारकली...
पण नंतर "मोहोब्बत की झुठी कहानी पे रोये, बडी चोट खाई जवानी पे रोये" असं म्हणते
तेव्हा काळजात कालवाकालव होते...
चार सुंदर क्षणांच्या चांदण्या हळूहळू शांत होत गेल्या की
मग आपलीही अवस्था "बेकस पे रेहम किजीये..." अशी होऊन जाते...
नाही होत आता सगळं सावरणं...
इतका वाढत चालला आहे पसारा....
नाही होत आता सगळं आवरणं...
खरंच... "बेकस पे रेहम किजीये..."
"बेकस पे रेहम किजीये..."
