मी सगळी मरणार नाहीमरून गेल्यानंतरही
मरायचं बाकी असेल बरंच काहीबाही
माझा एक इवला नकळता स्पर्श
तुझ्या तळहा
तावर तीळ बनूनउगवेल एक दिवस अचानक मधाळ
माझं एक अकारण खळाळतं हसू
तुझ्या शर्टाच्या कॉलरखालच्या
एक्स्ट्रॉ बटणासारखं
मी शिवून ठेवलेलं दिसेल, जे तू
काजात अडकवणारच नाहीस कधी
मनगटावर घड्याळाच्या पट्ट्याची
जाड फित उमटावी
त्वचेचा मूळ रंग दाखवत
तशी माझी आठवण
आणि बुटाच्या
वर आलेल्या खिळ्यासारखं
टोचणारं माझं बारीक भांडण
जिवंत राहील हे सारं तुझ्या मनात....
......................A Poem By Kavita Mahajan...
.jpg)