त्याने
तिच्याकडे पाहिलं... तिलाही तो आवडला होताच... त्याच्या नकळत तिने टेबलाखालून
मोबाईल वरून chat ओपन केलं, आणि बहिणीला पिंग केलं, "हेय श्रेया, he'j cool dude... atleast "one cofee must"
types.... " मॉम ला कळव, रिश्ता
पक्का..."
रात्र पापण्यांत उतरलेली...
अभ्यास कमरेवर हात ठेऊन इको च्या खडूस madam सारखा समोर
उभा... मागे उभा अभ्यास पुढे उभा अभ्यास... श्य्या.. तिने इथे तिथे पाहिलं,
बाकीच्या दोघीही पेंगुळल्या होत्या...तेव्हढ्यात आईने मायेने कॉफी आणली... आईला एक फ्लाइंग कीस देत तिने विचारलं
"तुला कसं कळलं मला कॉफी हवीये...? त्यावर आईचं कॉफीइतकं उबदार स्माईल...
वाट
पाहतोय... सीसीडी च्या गुबगुबीत सोफ्यावर पसरून... बाहेर अवेळी भरून आलेला पाउस...
आयपॉड वर गुलजार... इश्कीया ची गाणी... समोरच्या कॅफे लाते सारखा रेखा भारद्वाजचा नशीला
आवाज... जिन दिनो आप थे, आंख मे धूप थी.... वाट पाहताना कॉफी
वरचं क्रीम चं हार्ट वितळत चाललंय...
कॉफी
चं आणि मूड्स चं काहीतरी अजब नातं आहे बहुदा... आणि जसजसा काळ पुढे जातोय ते न
सुटणा-या गाठीसारखं घट्ट होत चाललंय...म्हणजे, पूर्वी सुद्धा कॉफी होतीच की.. एरवी चहाचं आधण हे
महत्वाचं इंधन असायचं, पण
मंगळागौर जागवल्यावर कॉफीच हवीहवीशी वाटायची, किशोरीताईंच्या
मैफिलीच्या मध्यंतरात मिळणारी कॉफीसुद्धा त्यांच्या
गाण्यासारखी आत खोलवर आत्म्यापर्यंत पोचायची... शिवाजी
मंदिर किंवा गडकरीला उत्तम नाटक, प्रेमाने
घेऊन दिलेला मोग-याचा गजरा आणि इंटर्वल मध्ये सुखवस्तूपण
जपणारी कॉफी म्हणजे "ह्यांना" पगार
मिळण्याच्या दिवसाची इतिकर्तव्यता....तेव्हाच्या बायकांना आपण कमावत्या आहोत,
याचा जो आनंद आणि वेगळेपणा वाटायचा, कॉफी
नेमकी तशीच होती... खास, सहज हाताशी नसलेली आणि म्हणूनच तिचं
अप्रूप....
पण
आता चैनीच्या गोष्टी गरज
कॅटेगरी मध्ये शिफ्ट व्हाव्यात तसं कधीमधी मिळणारी कॉफी आता मस्ट होऊन बसलीये...
यासाठी अर्थातच सीसीडी नामक संस्था कारणीभूत आहे. या sophisticated
college कट्ट्याने कॉफी या पेयाला आणि शब्दाला खूप वेगळा
"फील" दिला... गि-हाईक कधी जाणार
याची वाट पाहणारे वेटर, कॉफी म्हटल्यावर मिळणारी ती एकमेव
दुधाळ कॉफी, आणि मूड्स या शब्दाला जराही किंमत न देणारं त्या
हॉटेल चं वातावरण यातून कॉफी ला अलगद बाहेर काढण्याचं काम या सीसीडी ने चोख
केलं... आणि तरुणांची पावलं आपसूक या कॉफी कट्ट्याकडे वळायला लागली... tv वरच्या ads नी त्यात भर घातली आणि पाहता पाहता
कॉफी हे style stetment बनून गेलं. एकूणच कॉफी glamarous झाली या कॉफीला मुलीनी आपलं
आयकॉन मानणं स्वाभाविक आहे. आजच्या मुली कॉफीशी खूप जास्त attached आहेत, त्यांच्यातला स्मार्टनेस, कुल attitude आणि flexiblity हे
गुण त्यांना कॉफी मध्ये आढळत असावेत...आजच्या जनरेशनला एकाच गोष्टीसाठी
(आणि व्यक्तीसाठी सुद्धा मे बी)
खूप ऑप्शन हाताशी असण्याची सवय आहे, त्यामुळे खूप वेरिएशन्स असणारी कॉफी मुलीना जवळची वाटते... बोअर झाले
म्हणून फ्लेवर चेंज करणा-या आम्हा आजच्या मुलीना म्हणूनच बहुतेक कॉफी बेस्ट
वाटते... तसं तर चहा प्यायल्याने पण तरतरी येते, पण ती तरतरी
ही मूड जागवणारी नाही mind जागवणारी असते, मनाला नाही, मेंदूला उब देणारी असते... उगीचच आपण
चहापेक्षा कॉफी पितोय म्हणजे आपण जास्त स्मार्ट आहोत असं फील देणारा तिचा गंध आणि कपाच्या माध्यमातून तळव्यांना होणारी तिची
उबदार जाणीव... आयक्यू ला satisfy करणा-या चहापेक्षा इक्यू चं कोड कौतुक पुरवणारी ही कॉफी म्हणूनच बेस्ट फ्रेंड सारखी वाटते.
मैत्रिणीची
मेंदी नुकतीच आटपलेली ... आठवणीसुद्धा कोप-यातल्या टेडीबेअरसारख्या
केविलवाण्या होऊन गेलेल्या... मैत्रिणीच्या किचनमध्ये जाऊन एकीने केलेली खुशबुदार
झागदार कॉफी.... मेंदीला धक्का न लागू देता सगळ्या जणींनी तिला सिप सिप करून पाजलेली
कॉफी... कॉफीचा मग हातात धरून काढलेले फोटोज... उद्याच्या फेसबुक ची बेगमी...
प्रोफाईल पिक्चर तर परवा बदलेल पण डोळ्यातल्या पाण्याने खारट झालेली कॉफी मनाच्या
मग मध्ये कितीतरी वर्षं वाफाळत राहील...
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment