हात तुटून पडतील इतकं काम... माझ्यासमोर...
पाय तुटून पडतील इतकं ट्राफिक.. त्याच्यासमोर...
एकमेकाना मनोमन सॉरी म्हणत आम्ही आपापल्या बाजूने जीव खाऊन धावत, खाणं तोंडात कोंबत त्या जादुई नगरीच्या दारात येउन पोचतो...
सुरुवात चुकली नसू दे अशी प्रार्थना करत आत शिरतो आणि हुश्श करुन रेड लाउंज च्या गुबगुबीत सोफ्यात अंग टाकतो तेव्हा स्क्रीन वर "plz stand up for national anthem " दिसतं..
एकदाचे आम्ही फायनली सेटल होतो... आणि मग पुढचे २ अडीच तास फक्त जादू असते,
पाउस असतो, धुकं असतं, वाळवंट असतं, जंगल असतं....
लाल रेशमी पडदे असतात... पाचूसारखी हिरवी रानं असतात, निळसर आकाश असतो, उन्हाचं सोनं लखलखत असतं...
Emotions... moments, magic, tears fears, cry shy, senti, smiles, laughter n love....
70 mm च्या त्या स्क्रीन वर आम्ही आम्हाला शोधत असतो...
समोर कोणी कोणाला जवळ घेतं, किस करतं, पाठ फिरवत निघून जातं,
खट्याळपणा करतं, लाजतं, रागावतं...
त्या सगळ्यात आम्ही आम्हाला पाहत असतो...
जे आमच्या आयुष्यात घडतं ते समोर दिसलं तर आम्ही रिलेट करतो,
जे घडू शकत नाही ते दिसलं की आम्ही imagine करतो....
त्या अडीच तासात आम्ही आमचे सगळे प्रॉब्लेम्स, त्रास, कटकटी, भांडण सगळ विसरलेलो असतो....
दरवेळी, एक नवी फिल्म, आम्हाला आधीपेक्षा जवळ आणते,,,,
कासावीस करते, विचार करायला लावते, पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडायला लावते...
..........................
बाहेर आलो की लख्ख उजेड असतो, डोळे दिपतात क्षणभर,,
तरी थिएटर मधल्या अंधारात दिसलेली स्वप्न अजून रेंगाळली असतात...
डोळ्यात असतात salted आसू..
आणि ओठांवर caramel popcorn इतकं गोड हसू...
................................
कितीही तंगी, कडकी महागाई आली,
कितीही काटकसर करावी लागली,
तरी वाटेल तेव्हा वाटेल ती फिल्म बघण्याइतके पैसे
नक्की कमावणार मी...
कमवू आम्ही...
.............................

