Thursday, November 18, 2010

किसीने अपना बना के मुझको....


आयुष्य लख्ख दिव्यांची मैफिल असणा-यांना क्वचित भेटलेल्या अंधाराचा सुद्धा सोहळा करावासा वाटतो...
आज अनेक वर्षांनी अर्ध्या तासासाठी लाईट काय गेले, मी लगेच candle stand वर मेणबत्त्या वगैरे लावून मैफिल ए रोशनी चा फील आणला...
पण मी जर १४ तास लोड शेडींग होणा-या गावात राहात असते तर....
तिथेच तर राहात होते इतकी वर्षं, अंधारात पावलं ठेचकाळायची... दुखावले जायचे... भळाभळा पाणी वाहायचं डोळ्यांतून...
आधीच्या जखमेचे व्रण पुसले जात नाहीत तोवर नवे घाव सोसायला मन शिकलं होतं ..
god.. काय आयुष्य होत यार ते... आता आठवतात त्या सा-या संध्याकाळी जेव्हा मी एकटीच त्याच्या बाल्कनीत उभी असायचे..
खूप एकट वाटायचं तेव्हा...
आता जखमा भरून येतायेत, कोणीतरी फुंकर मारणारं मिळालं आहे आता...
अजूनही गल्लत होतेच...
जुने घाव भळभळायला लागतात... अशा वेळी फुंकर घालणारा हिरमुसतो...
आपली फुंकर कमी पडतेय का असं वाटून...
कसं समजवायचं त्या वेडूला की.... सगळ्या जखमा फुंकरीने नाही ब-या होत...
जाउदे, सगळच्या सगळ एखाद्याला कळेल अशी तरी का अपेक्षा करायची...
वो रंग भरते है जिंदगी मे, बदल रहा हैं मेरा जहां...
जो ख्वाब रातों मे भी ना आया, वो मुझको दिन मे दिखा दिया....
किसीने अपना बना के मुझको....
मुस्कुराना सिखा दिया...

No comments:

Post a Comment